पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बारावी गुणपत्रिकेवरील 'अनुत्तीर्ण' शेरा होणार गायब

विद्यार्थी

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर नापास म्हणजे अनुत्तीर्ण हा शेरा यापुढे दिसणार आहे. नियमित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण हा शेरा न देता 'फेरपरीक्षेसाठी पात्र' किंवा 'कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र' असा शेरा देण्यात येणार आहे. याबाबत शासनाने निर्णय जारी केला आहे.

...तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल; मनसेचा वारिस पठाणांना इशारा

बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टिने अत्यंत महत्वाची आहे. या परिक्षेतील यशापयशावर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याची दिशा ठरत असते. बारावी परिक्षेला बसणारा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. शासनाच्या नियमानुसार या पुढे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण शेरा दिसणार नाही, असे शासन निर्णयात म्हटले आहे.   

१३ अ‍ॅक्शन प्लॅनसंदर्भात एफएटीएफकडून पाकला 'अल्टिमेटम'

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण हा शब्द न वापरता विद्यार्थी पुरवणी परिक्षेत श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण असल्यास 'फेरपरीक्षेसाठी पात्र' असा शेरा देण्यात येतो. त्याच धर्तीवर कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर देखील सुधारित शेरा नमूद करण्यात येणार आहे. बारावीच्या जुलै/ऑगस्ट २०२० च्या पुरवणी परिक्षेपासून गुणपत्रिकेमध्ये हा बदल करण्यात येणार आहे. 

दादरमध्ये कापडाच्या दुकानाला भीषण आग