पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारचा आणखी एक महत्त्वाचा आदेश

शासन आदेशात म्हटले आहे की, एसीमुळे कोरोना विषाणूचा सक्रीय राहण्याचा कालावधी वाढू शकतो.

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील वातानुकूलित सेवा (एअर कंडिशन) तूर्त बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी या संदर्भातील शासन आदेश जारी केले आहेत.

जनता संचारबंदीमुळे रविवारी दिल्ली मेट्रो सेवा बंद राहणार

शासन आदेशात म्हटले आहे की, एसीमुळे कोरोना विषाणूचा सक्रीय राहण्याचा कालावधी वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो कार्यालयातील हवा खेळती राहिल असे बघा. त्यामुळे सरकारी कार्यालयातील एसी बंद करून खिडक्या उघड्या ठेवा. 

या संदर्भात १८ मार्चला शासकीय आदेश काढण्यात आला आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण खोकला, शिंकणे यातून हवेत मिसळणाऱ्या आणि पृष्ठभागावर टिकणाऱ्या सूक्ष्म कणांतून होते. जर बाहेरील वातावरण थंड असेल तर या कणांचा सक्रीय राहण्याचा कालावधी जास्त असतो. याचा विचार करून शासकीय कार्यालयात आवश्यक काळजी घ्या. नैसर्गिक हवा खोलीमध्ये येत राहिल, याकडे लक्ष द्या.

खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करु नये : मुख्यमंत्री

राज्यातील सर्व विभागीय कार्यालये, महापालिका, पोलिस आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, सर्व मंत्रालये यांना हा आदेश पाठविण्यात आला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra government asked government office to keep AC shut to minimise the life of droplets