पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गूड न्यूज! राज्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी २० कोटी डॉलरचा करार

ग्रामीण भागातील रस्ते निर्मिती

महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील रस्ते निर्मितीसाठी आणि त्याची देखभाल करण्यासाठी केंद्र सरकारने एशियन डेव्हलपमेंट बँकेशी २० कोटी डॉलरचा कर्ज करार केला. या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या सर्व जिल्ह्यांतील ग्रामीण रस्ते सर्व प्रकारच्या हवामानाशी सुसंगत दर्जाचे करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.

मोहम्मद शमीला दिलासा, अटकेला स्थगिती

एशियन डेव्हलपमेंट बँकेचे भारतातील उपसंचालक सव्यसाची मित्रा म्हणाले, या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील २१०० किलोमीटरचे रस्ते सुधारण्यात येणार आहेत. हे रस्ते सर्व प्रकारच्या हवामानाशी सुसंगत दर्जाचे करण्यात येणार असून, रस्ता सुरक्षेचाही विचार करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शेती क्षेत्राला बाजाराशी जोडण्याच्या दृष्टीनेही रस्ते निर्मितीचा या प्रकल्पात विचार करण्यात आला आहे. 

केंद्र सरकारमधील आर्थिक व्यवहार खात्याचे अतिरिक्त सचिव समीरकुमार खरे यांनी केंद्र सरकारच्या वतीने या करारावर स्वाक्षरी केली. यासंदर्भात समीरकुमार खरे म्हणाले, ग्रामीण भागातील रस्ते सुधारणे हा केंद्र सरकारचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. यामुळे ग्रामीण भागातील गरिबी दूर होण्यास आणि तेथील लोकांचे राहणीमान सुधारण्यास मदत होणार आहे. चांगल्या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील शेतीमाल जवळच्या बाजारापर्यंत वेगाने पोहोचू शकेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगली किंमत मिळू शकेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

भारत-पाकदरम्यान तणाव घटला, मदतीसाठी मी तयारः डोनाल्ड ट्रम्प

या प्रकल्पांतर्गत रस्ते निर्मितीनंतर पुढील पाच वर्षे त्याची देखभाल करण्याची जबाबदारी असणार आहे, असे सव्यसाची मित्रा यांनी स्पष्ट केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra gets 200 million dollar loan from Asian Development Bank to build rural roads