पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोलीत पूरसदृश्य स्थिती, अहेरीत २५ गुरांचा विद्युत प्रवाहाने मृत्यू

गडचिरोलीत पूरसदृश्य स्थिती, अहेरीत २५ गुरांचा विद्युत प्रवाहाने मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. रविवारी पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र गोसीखुर्द आणि चिचंडोह धरणाचे पाणी वैनगंगा नदीत वेगाने प्रवाहित होत असल्याने पैनगंगा नदीच्या उपनद्या उलट प्रवाही झाल्या आहेत. याशिवाय नागपूर वेधशाळेने रविवारी देखील जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, अहेरी तालुक्यातील देवलमरी इथे २५ गुरांचा विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला आहे.

कोल्हापूरः राधानगरी धरणाचे ५ दरवाजे उघडले, सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यातील वैनगंगा-कठाणी-खोब्रागडी-दिना-प्राणहिता यासह पाल नदीने पात्र सोडले असून, यामुळे कित्येक हेक्‍टर शेती पुराच्या पाण्याखाली आली आहे.  सलग पाचव्या दिवशी अतिदुर्गम भामरागड तालुका पर्लकोटा नदीच्या पुराने वेढला असून, या ठिकाणची परिस्थिती बघण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शनिवारी शहराची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. या शहरात सुमारे ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, २५० ते ३०० गावं संपर्कविहीन झाली आहेत. या सर्व गावांच्या स्थानिक प्रशासनाशी जिल्हा मुख्यालय संपर्क राखून आहे. 

एका महिन्याच्या मुलीवर तोल जाऊन पडल्याने तिचा मृत्यू

दरम्यान, अहेरी तालुक्यातील देवलमरी इथे २५ गुरांचा विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला आहे. व्यंकटापूरकडे जाणारी वीज देवलमरी नाल्यातून जाते. पुरामुळे वीज तारा पाण्यात बुडाल्या. याच नाल्यातून घराकडे परत जाताना २५ गुरांना विजेचा प्रचंड धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. यामुळे गोपालकांवर संकट कोसळले आहे. देवलमरी अहेरी मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर आहे.

विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या युवा शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू

रविवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, गणेश विसर्जनाचे दिवस असल्याने गणेशभक्तांनी नदीपात्रात खोल जाऊ नये, असेदेखील प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात पुरामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे.