पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजकीय वर्तुळात फडणवीस अन् दुसऱ्या ठाकरेंच्या भेटीची चर्चा!

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही नेत्यांकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर त्यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत घरोबा करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. २३ जानेवारीला मुंबईतील महामेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावर प्रतिक्रिया देणार की त्यापूर्वी काही माहिती समोर येणार हे उत्सुकतेचे ठरेल. 

JNU कँम्पस परिसरातील आंदोलनात अभिनेत्री दीपिकानेही लावली हजेरी

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदाच्या वादावरुन शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सरकार स्थापन केले. सत्तासंघर्षाच्या काळात फ्लोअर बहुमताच्या वेळी मनसेचा एकमेव आमदार तटस्थ राहिल्याचे पाहायला मिळाले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपला धारेवर धरल्यानंतर भाजप आणि मनसे यांची समीकरणं कोणत्या मुद्यावर जुळणार हे येणारा काळच ठरवेल. पण शिवसेना एकसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेससोबत ऐकी दाखवू शकते तर मनसेलाही भाजपसोबत जाण्यात फार मोठी अडचण येईल, असे वाटत नाही. 

'फ्री काश्मीर'चे पोस्टर का झळकावले, मेहक प्रभूने केला खुलासा

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे भाजपसोबत जाण्याचा विचार करु शकतात, असे सूचक वक्तव्य केले होते. भविष्यातील राजकारणात काहीही घडू शकते असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनसे-भाजप असे समीकरण भविष्यात पाहायला मिळू शकते अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. त्याला आता फडणवीस आणि राज ठाकरे भेटीने बळ मिळत आहे.