पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप-सेना दुरावा कायमचा नाही, माजी मुख्यमंत्र्यांना युतीचा विश्वास

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत असताना भाजप-शिवसेना यांच्यातील टोकाच्या भूमिकेमुळे दोन्ही मित्रपक्षात शत्रूत्व निर्माण झाले आहे. सत्तासंघर्षाच्या दरम्यान निर्माण झालेल्या दरीमुळे भविष्यात युतीची चर्चा होईल, अशी परिस्थिती सध्याच्या घडीला दिसत नाही. मात्र माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांना भाजप-शिवसेना यांच्यातील दरी फार मोठी भासत नाही. त्यामुळेच त्यांनी भविष्यात दोन्ही पक्ष पुन्हा एकत्रित येऊ शकतात, असा विश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना  व्यक्त केलाय. 

CM उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसे म्हणाले की,...

भाजप-शिवसेना एकत्र येण्याचे मार्ग पूर्णपणे बंद झालेले नाहीत. हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्रित येऊ शकतात. मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे योग्यवेळी याबाबत निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद करत बसण्यापेक्षा काही गोष्टी सहन करुन एकत्रितपणे पुढे जावे लागेल. ज्या गोष्टींवर एकमत आहे त्यावर जोर देऊन दोन्ही पक्ष चांगल्या पद्धतीने काम करु शकतात, असेही त्यांनी सांगितले.

भाजपला विरोध करणारा 'देशद्रोही' हा भ्रम : उद्धव ठाकरे

राज्यातील विधानसभा निवडणुकींमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन भाजप-शिवसेना यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले. एनडीएची साथ सोडून शिवसेनेने पारंपारिक विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन केले. शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली, अशी टीका भाजपकडून झाली. तर शब्द पाळला नाही म्हणून हे सर्व करावे लागले असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. एकंदरीत दोन्ही पक्षात टोकाचे मतभेद दिसत असताना ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी दुरावा हा कायमस्वरुपी नसल्याचे सांगत राजकारणात पुन्हा 'हम साथ साथ है! सीन दिसू शकतो, असा विश्वास व्यक्त केलाय. हा योग नक्की येणार का? आणि आलाच तर कधी यासाठी मात्र प्रतिक्षाच करावी लागेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Former Chief Minister and Shiv Sena leader Manohar Joshi says BJP and Shiv Sena will come together