पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी, घर बांधणीसाठी अतिरिक्त १ लाखाची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी  कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एक हेक्टरमधील पिकासाठी ज्यांनी कर्ज घेतले होते आणि पूरामध्ये त्यांचे नुकसान झाले आहे त्यांना बँकेच्या नियमानुसार मिळणारे कर्ज माफी केली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले नाही त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानामध्ये तिप्पट अनुदान दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पडझड झालेली घरे बांधून देण्यात येतील. याशिवाय केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीशिवाय पूरग्रस्तांना राज्याकडून अतिरिक्त १ लाख रुपये मदत दिली जाईल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. 

पडझड झालेल्या घरांबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, महापूरामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पडलेली घरे बांधून दिली जातील. शिवाय केंद्राकडून मिळणाऱ्या निधीशिवाय राज्याकडून १ लाख रुपये अतिरिक्त मदत दिली जाईल. नव्याने घरे उभारण्यासाठी ६ ते ८ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. याकाळात बेघर झालेल्या पूरग्रस्तांच्या राहण्याचा प्रश्नचाही सरकारने विचार केला आहे. ग्रामीण भागात भाडेतत्वार राहण्यासाठी २४ हजार तर शहरी भागातील पूरग्रस्ताला ३६ हजार रुपये निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.