पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पावसानं शेतीचं नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या, ६ दिवस मृतदेह झाडावरच

संग्रहित छायाचित्र

अकोल्यातील गावात राहणाऱ्या ६२ वर्षीय शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. ६ दिवसांनंतर पोलिसांना त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत झाडावर आढळला. तुळशीराम शिंदे असं  आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून पावसामुळे सोयाबीन पिकाची नासाडी झाल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना चौकशीत दिली आहे. 

बेकायदा वास्तव्यावरून अमेरिकनं १४५ भारतीयांना पाठवलं माघारी

अकोला शहरापासून ७० किलोमीटर दूर असलेल्या नवेगावच्या जंगलात शिंदे यांचा मृतदेह  वनाधिकाऱ्यांना झाडावर आढळला. शिंदे हे १३ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. 

शिंदे यांनी १३ नोव्हेंबररोजीच आत्महत्या केली होती. मात्र मंगळवारी त्यांचा मृतदेह वनधिकाऱ्यांना घनदाट जंगलात आढळला. ते जंगलात दूरपर्यंत गेले होते त्यामुळे कोणालाही त्यांचा शोध घेता आला नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली. 

बहीण, वहिनीवर बलात्कार करणाऱ्या मुलाचा आई-वडिलांकडून खून

अवकाळी पावसामुळे शिंदे यांची सोयाबीनची शेती पूर्णपणे उद्धवस्त झाली होती. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.