पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुर्लक्ष करु नका, गाफील राहू नका, राज ठाकरेंची जनतेला विनंती

मनसे प्रमुख राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा देताना सरकारला इशाराही दिला आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी दुष्काळ आणि बेरोजगारी या दोन संकटाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही, असे त्यांनी म्हटले आहे. या दोन्ही विषयात सरकारने त्यांच्या कामगिरीचे पोकळ दावे करण्याच्या पलीकडे जायला हवे असे सांगताना माध्यमांनीही अशा दाव्यातील तथ्ये तपासायला हवी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. दुष्काळ आणि बेरोजगारी या दोन संकटांकडे दुर्लक्ष करु नका, गाफील राहू नका अशी विनंती राज यांनी जनतेला केली आहे.

काय म्हटलंय राज ठाकरे यांनी...

सर्वप्रथम मराठी जनांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 

अगदी परवाच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतील महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. गेले काही आठवडे एकूणच वातावरण निवडणूकमय झालेले असल्यामुळे सर्वांचेच, अगदी माध्यमांचे देखील दोन गंभीर विषयांकडे सपशेल दुर्लक्ष झाले. दुष्काळ आणि बेरोजगारी.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्राला या दोन संकटांकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. 

महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती प्रचंड गंभीर आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते तर यावेळचा दुष्काळ हा १९७२ च्या दुष्काळापेक्षा गंभीर आहे. एका बाजूस दुष्काळामुळे गावच्या गावे ओस पडली आहेत आणि तिथल्या लोकांचे तांडे शहरांकडे उपजीविकेच्या शोधात येत आहेत. तर दुसरीकडे शहरांमध्ये फक्त असंघिटत नाही तर अगदी उच्च कौशल्याधारित व्यवसायातील तरुण-तरुणी देखील त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. अनेक सरकारी आस्थापनांमध्येच पगार वेळेवर होत नसतील तर खासगी उद्योगांमध्ये काय अवस्था असेल ?..

या दोन्ही विषयात आता सरकारने त्यांच्या कामगिरीचे पोकळ दावे करण्याच्या पलीकडे जायला हवं आणि माध्यमांनी देखील अधिक काटेकोरपणे या दाव्यातील तथ्यं तपासायला हवीत. निवडणुका येतील, जातील, पण त्याच्यापलीकडे जाऊन आपल्याला या विषयाकडे बघायला हवं.

राज ठाकरेंनी केलेले टि्वट

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra day 2019 mns chief raj thackeray speaks on drought situation and unemployment bjp