पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

७७८ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६,४२७ वर

गोव्यात कोरोना विषाणूची सुरुवात १८ मार्चला झाली होती.

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात आज (गुरुवारी) आणखी वाढ झाली. मागील २४  तासांत तब्बल ७७८  नव्या रुग्णांसह महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा हा ६ हजार ४२७ वर पोहचला आहे.  चोवीस तासातील १४ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला असून राज्यात आतापर्यंतचा मृतांचा आकडा हा २८३ इतका झाला आहे.  कोरोनाविरोधातील संकटात राज्य सरकार आणि प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असला तरी राज्यात कोरोनाची चाचणी घेण्याचे प्रमाणही सर्वाधिक आहे.

WHO च्या कार्यकारिणीत भारताला मिळणार मानाचे स्थान

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यात ९६ हजार ३६९ लोकांची कोरोनासंदर्भातील चाचणी घेण्यात आली आहे. एका दिवसात ६ हजार १३६ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असला तरी कोरोनातून अनेक रुग्ण बरे देखील होत आहेत. मागील २४ तासांतील ५१ रुग्णांसह आतापर्यंत ८४० रुग्ण बरे झाले आहेत.  राज्यातील मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा सर्वाधिक आहे. एकट्या मुंबईत मागील २४ तासांत ५२२ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. या रुग्णांसह मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४ हजार २०५  वर पोहचलाय. नव्या ६ नव्या रुग्णांच्या मृत्यूनंतर शहरातील मृतांचा आकडा हा १६७ वर पोहचला आहे. 

लॉकडाऊनमध्येही अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदीला 'अच्छे दिन'

देशातील कोरोनाग्रस्ताचा आकडा हा २१ हजार ७०० वर पोहचला आहे. मागील २४ तासात कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झालेल्या रुग्णांचा देशभरातील आकडा हा १ हजार २२९  इतका आहे. त्यातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्राशिवाय गुजरात आणि देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वेगाने वाढताना दिसत आहे.