पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात दुप्पट

ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या एका महिन्यात १००० च्या वर गेली आहे. राज्यात पुण्यामध्ये ९ मार्चला एका दाम्पत्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याला गुरुवारी एक महिना होत आहे. बुधवारी रात्रीपर्यंत राज्यात १२९७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर आतापर्यंत या आजारामुळे ७२ जणांचा बळी गेला आहे. 

लॉकडाऊन वाढविला तरी काही उद्योगांना सूट देण्याची वाढती मागणी

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ३० दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १००० च्या वर गेली. विशेष म्हणजे संपू्र्ण भारताचा विचार करता या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. देशाच्या तुलनेत हा मृत्यूदर महाराष्ट्रात दुप्पट आहे. 

९ मार्चला पुण्यात राहणाऱ्या एका दाम्पत्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. हे दाम्पत्य नुकतेच दुबईहून परतले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत आहे. मुंबईत ही संख्या ७०० च्या पुढे गेली आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन राज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी अजून महाराष्ट्र दुसऱ्याच टप्प्यात आहे. जे परदेशातून आलेले आहेत आणि त्यांच्या जे संपर्कात आलेले आहेत त्यांनाच या आजाराची लागण झाल्याचे समोर येत आहे. राज्यात अजून समूह संसर्गाला सुरूवात झालेली नाही, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले.