राज्यातील आतापपर्यंत पाच हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी नव्याने आढळलेल्या ५५२ रुग्णानंतर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार २१८ वर पोहचला आहे. मागील २४ तासांत १९ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला असून राज्यातील मृतांचा आकडा हा २५१ इतका झाला आहे. आज ज्या रुग्णांनी जीव गमावला यात मुंबईच्या १२, पुणे ३ , ठाणे २ आणि पिंपरी-चिंचवड आणि सांगलीतील एका रुग्णाचा सामावेश आहे.
CM ठाकरेंनी पुणे-मुंबईमधील लॉकडाऊनची शिथिलता केली रद्द
२० एप्रिलपासून राज्यातील ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी काही भागातील लॉकडाउनच्या नियमात शिथिलता देण्यात आली होती. राज्यातील वाढता आकडा लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई-पुणे येथील लॉकडाऊनचे नियम हे पूर्वीप्रमाणेच कठोर राहतील, असे आदेश देण्यात आले आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाची लागण झालेले रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. यातही मुंबई अव्वलस्थानी असून पुणे आणि इतर शहरी भागातील रुग्णांचा आकडा हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे.ग्रामीण भागातील परिस्थिती शहराच्या तुलनेत उत्तम आहे. पण लॉकडाउनमधी शिथिलतेनंतरही याठिकाणचे उद्योगधंदे ठप्पच दिसले. ग्रामीण भागातील परिस्थिती रुळावर येण्यासाठी काही वेळ जाण्याचे संकेत दिसून येतात.
दिलासादायक! एका दिवसात ७०५ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुंबईतील आकडा हा दिवसागणिक वाढत असून धारावी परिसरातील रुग्णांचा वाढता आकडा राज्य सरकार आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.