सरकार स्थापन करताना अनेक अडचणी होत्या, पण आम्ही त्यावर मात केली, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. संकट कितीही येऊ द्या त्यावर मात करण्याची हिंमत पाहिजे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे उद्योजकांना दिला आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान औरंगाबाद येथे महाएक्स्पो प्रदर्शनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला.
मुंबई पोलिसांना मोठे यश, गँगस्टर एजाज लकडावालाला बेड्या
देशातील उद्योजकांचे लक्ष वेधून घेणारे महाएक्स्पो प्रदर्शन आहे. तुम्हाला पायावर खंबीरपणे उभं करणारे हे सरकार आहे. उद्योजकांना प्रेरणा देण्याचे काम सरकार करणार आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एक्स्पो प्रदर्शनासाठी प्रयत्न करणार, असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्योजकांना दिले. मंदी आली म्हणून रडत बसलो तर लढणार कसे. राज्याला रडायची नाही, तर लढायची सवय आहे, असे त्यांनी उद्योजकांना सांगितले.
काही विचारवंत सापासारखे विषारी - उमा भारती
दरम्यान, परदेशी बनावटीचे आकर्षण आता संपले आहे. जगाला मेड इन इंडियाची भूरळ पडली पाहिजे. तसंच विकासाचा दिवा पेटला पाहिजे, असे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले आहे. तसंच, शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसह चिंतामुक्त करु, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. दोन घास पिकवणारा मेला तर दोन घास खाणारे कसे जगणार असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. कृषी आणि उद्योग क्षेत्र एकत्र करुन शेतकऱ्यांना मदत करु, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.