पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनचा कालावधी वाढवावाच लागेल, CM ठाकरेंची PM मोदींकडे सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विरोधातील सामना जिंकण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसंदर्भातील मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांमध्ये आज (शनिवारी) चर्चा झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत विनंती केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाहतूक व्यवस्थेवरील निर्बंध आणखी काही दिवस कायम ठेवण्याची सूचना केली. 

 

गरिबांच्या खात्यात पैसे जमा करा, पी. चिदंबरम यांची PM मोदींकडे मागणी

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवागणिक वाढत आहे. महाराष्ट्रातील आकडा हा सर्वाधिक आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मास्क घालून चर्चेत सहभागी झाल्याचे दिसले. सध्याच्या घडीला मास्क वापरणे अनिवार्य आहे, असा संदेशच त्यांनी यातून दिला. राज्यातील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचा केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, असा विश्वास मोदींनी दिला आहे.

चीन विकसनशील देश तर मग आम्हालाही तोच दर्जा द्या - डोनाल्ड ट्रम्प

राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या चर्चेत उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा मांडल्यानंतर आता लॉकडाऊनचा कालावधी किती वाढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बैठकीनंतर उद्धव ठाकरे याबाबत प्रतिक्रिया देणार की केंद्राकडून यासंदर्भात काही आदेश येणार यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra CM uddhav thackeray Demand to Prime Minister Narendra Modi lockdown extension