पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलमट्टीतून पाच लाख क्युसेक्सने विसर्ग, सांगलीतील पूर कमी होणार

कोल्हापुरात एनडीआरएफचे पथक पूरग्रस्तांना मदत करताना (Photo- Sushant Jadhav)

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीला आलेल्या पुराची तीव्रता कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना आलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची मागणी केली होती. ती येडियुरप्पा यांनी मान्य केली असून, आलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनीच कोल्हापूरमध्ये गुरुवारी ही माहिती दिली.

सांगलीतील ब्रह्मनाळ येथे बोट उलटली; १२ जणांचा मृत्यू

आलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक्सने विसर्ग सुरू झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील पूर कमी होण्यास मदत होणार आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीची पाण्याची पातळी ५६ मीटरपर्यंत जाऊन पोहोचली आहे. सांगली शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गुरुवारी कोयनेतून  नदीमध्ये होणारा विसर्ग कमी झाला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाल्यामुळे विसर्गाचे प्रमाण कमी करण्यात आले. आता आलमट्टी धरणातील विसर्ग वाढविल्यास त्यामुळे सांगलीतील पूर ओसरण्यास मदत होणार आहे. 

आता शाळेची फी सुद्धा या अ‍ॅपच्या साह्याने भरू शकणार

मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत
पूरामध्ये बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कोल्हापूरमध्ये केली आहे. त्यांनी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्यासह कोल्हापूरमधील पूरस्थितीची हवाई पाहणी केली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra CM Devendra Fadnavis spoke to Karnataka CM BS Yediyurappa who agreed to release 5 lakh cusecs water from Almatti Dam in Karnataka