बाबासाहेबांनी आपल्याला लढायला शिकवले. त्याकाळात बाबासाहेबांनी विषमतेविरोधात लढा दिला. आज आपण विषाणूशी लढा देतोय. तेव्हा विषमतेवसोबत अन् आता विषाणूसोबतची लढाई सुरु आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. खांद्याला खांदा लावून आपण लढ्यात उतरलो आहे. कोरोना विषाणूमुळे देशासह राज्यात उद्भवलेल्या संकटाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करणाऱ्या भीम सैनिकांचे मी खास आभार मानतो, असा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
वांद्र्यात लॉकडाऊनचे उल्लंघन, घरी जाण्यासाठी मजुरांची स्टेशनवर गर्दी
भीम सैनिकच नव्हे तर बाबासाहेबांचे भक्त मोठ्या संख्येन एकत्रित येऊन महामानवाला अभिवादन करत असतात. मात्र सध्याच्या संकटात प्रत्येकाने घरीच बाबासाहेबांना अभिवादन केले, हे कौतुकास्पद आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्याने दिलेल्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करुन देशव्यापी लॉकडाऊनचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले. मुंबई-पुणे शहरात कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता याठिकाणी चाचणीची संख्या वाढवत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. देशातील संशोधकांनी तज्ज्ञांनी लस शोधण्यासाठी पुढाकार घ्यावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. राज्याने यादृष्टिने पावले उचलली आहेत. प्लाज्मा आणि बीसीजी लसचा प्रयोग करण्याबाबत राज्याने केंद्राकडे परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळाली तर आपण कोरोना विषाणूला रोखण्यास उपयुक्त ठरणारे औषधही तयार करु, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
देशात १० लाख व्यक्तींमागे केवळ १४९ टेस्ट, राहुल गांधींनी केला दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी २१ हजार योद्धे सज्ज
कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत वैद्यकीय क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी तसेच वैद्यकीय शिक्षण घेऊनही या क्षेत्रापासून दूर असलेल्या प्रशिक्षितांनी कोविड योद्धा या ईमेलवर आपली माहिती देऊन लढ्यासाठी मैदानात उतरावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. याला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आतापर्यंत २१ हजार लोकांनी कोरोना विरोधातील लढ्यात सरकारसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये वार्ड बॉय, परिचारिका तसेच अन्य विभागाशी संबंधित माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.