पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

MLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशातील कोरोनाच्या संकटासोबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खुर्ची आपल्याकडे कायम ठेवण्याचे कसोटी आहे. महाविकास आघाडीच्या  मंत्रीमंडळाने विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त दोन जागेपैकी एका जागेवर उद्धव ठाकरे यांची निवड करावी असा प्रस्ताव राज्यपालांसमोर ठेवत ही कसोटी जिंकण्याच्या दिशेने पाउल टाकले आहे. अद्याप राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दूरध्वनीवरुन संवाद साधल्याचे वत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांनी राजनैतिक आणि संविधानिक मुद्यावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय राज्यपालांच्या हाती असताना दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर राजकारणाला कोणते वळण येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक न लढवता २८ नोव्हेंबर २०१९ रोजी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. कोणत्याही सभागृहाचा सदस्य न होता मंत्रिपदाची शपथ घेता येते. परंतु, पुढील सहा महिन्यात संबधित मुख्यमंत्र्यांना विधानसभा किंवा विधानपरिषद दोन्हीपैकी एका सभागृहात निवडून यावे लागते.

अजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

गेल्या एक महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे देशातील अनेक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यासाठी सहा महिन्यांच्या आत उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर निवडून यावे लागणार आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन रिक्त जागेपैकी एका जागेवर मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या कॅबिनेटने घतेला असून याला राज्यपालांच्या मंजूरीची आवश्यकता आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray speaks with Prime Minister a day after state cabinet made second recommendation to Governor to nominate Thackeray to Legislative Council sources