पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश: CM ठाकरेंचा मोठा निर्णय

उद्धव ठाकरे

मुंबईतील आरे कारशेड आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील  नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश सोमवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाणारविरोधी आंदोलनातील कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रियांका गांधींच्या सुरक्षेसाठी तैनात CRPF जवानांकडून मोठी चूक

ठाकरे यांनी आरे मेट्रो आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील मागणीने जोर धरत असल्याची चर्चा सुरु होत असतानाच त्यांनी हा विषयही लागलीच निकाली काढला. यापूर्वी २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. मात्र ठाकरेंनी अखेर यावर कोणताही विलंब न लावता नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घेतले आहेत. २०१८ मध्ये नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवताना आंदोलकांनी रामेश्वर काटे कोलवाडी येथे भाजप नेत्यांची वाहनं अडवल्याप्रकरणी ३५० हुन अधिक आंदोलनकर्त्यांवर विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सरकार नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात फेरविचार करेल : मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीदरम्यान कोकणातील महाजनादेश यात्रेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाबाबत सरकार फेरविचार करणार असल्याचे भाष्य केले होते. राजापूरमधील सभेला संबोधन करताना फडणवीस म्हणाले की, नाणार प्रकल्पामुळे एक लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ही ग्रीन रिफायनरी आहे. विरोधामुळे सरकारने प्रकल्प रद्द केला. मात्र तुमचा उत्साह पाहून यासंदर्भात पुन्हा चर्चा करावी लागेल. शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध असताना फडणवीसांनी कोकणात शिवसेनेवर बाण मारल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray orders to withdraw the cases registered against protesters who agitated against the Nanar Refinery project