पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सावरकरांच्या 'त्या' विचाराशी BJP द्रोह करत आहे का? CM ठाकरेंचा सवाल

उद्धव ठाकरे

स्वांतत्र्यवीर सावरकर आणि नागरिकत्व कायदा यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भातील आरोप-प्रत्यारोपासंदर्भात आपली भूमिका काय? अशी विचारणा करण्यात आली होती.  

प्रशासनाचा अनुभव नसला तरी आत्मविश्वासाची कमी नाही: CM उद्धव ठाकरे

यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या एकेकाळच्या मित्रपक्षाला विचारु इच्छितो की,  आसाम पेटलेलं आहे. दिल्लीमध्ये अशांतता आहे. संपूर्ण देशात अस्वस्थता आहे. जर तुम्ही सावरकरांना मानता तर सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत देश एक रहावा, असा त्यांचा विचार होता. तो देश तुम्ही एकत्र करणार आहात की नाही? पीडितांना तुम्ही इथे बोलवत आहात. भलेही त्यात हिंदू असतील तरी याचा अर्थ तुम्ही सावरकरांच्या विचारांचा द्रोह करत आहात असाच होतो. त्या देशात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असतील तर गाठ हिंदुस्थानशी आहे, असे ठणकावून सांगायला हवे होते. नागरिकत्व कायद्यासंदर्भात काही आक्षेप घेण्यात आले आहेत. यासंदर्भात कोर्ट काय निर्णय घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असा उल्लेखही उद्धव ठाकरे यांनी केला.  

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीही पेटले

ते पुढे म्हणाले सावरकरांबाबतच्या प्रश्नावर शिवसेना जेवढी आक्रमक आणि आग्रही होती तेवढी आक्रमकता भाजपने कधीच दाखवली नाही. सावरकरांबाबत शिवसेनेची काल जी भूमिका होती तीच आजही आहे आणि उद्याही राहिल. सावरकरांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी शिवसेनेकडून यापूर्वी करण्यात आली होती. ती मागणी तुम्ही पुन्हा करणार आहात का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, आम्ही जी मागणी केली होती तो त्यांचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे नागरिकत्व कायदा आणला तशी भूमिका सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात मोदी सरकारने घ्यायला हवी. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray in Nagpur on Citizenship Amendment Act And Savarkar