पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवारांच्या बर्थडे दिवशी ठाकरे-पवार कुटुंबिय एका फ्रेममध्ये

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कुटुंबियांसह घेतली शरद पवारांची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी 'सिल्व्हर ओक'वर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आमदार आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत होते. पवार कुटुंबियांनी ठाकरे कुटुंबियांचं स्वागत केले. पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे, कन्या आणि पुत्र असं कुटुंबही यावेळी उपस्थित होते. या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील उपस्थित होते.

अखेर ठाकरे सरकारचे खातेवाटप जाहीर, पाहा कोणाकडे कोणती जबाबदारी

शुभेच्छा भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. सरकारच्या खातेवाटपाबाबत तसेच मंत्रिमंडळाच्या आगामी विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी, असा अंदाज आहे. यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील देखील उपस्थित असल्याचे समजते. 

एवढा राग बरा नव्हे! त्या १६ वर्षीय तरुणीला ट्रम्प यांचा सल्ला

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवेली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या प्रत्येकी दोन-दोन मंत्र्यांनी शपथ घेतली होती. तब्बल दोन आठवड्यानंतर या सहा मंत्र्यांसंदर्भातील खातेवाटपाच महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी घेण्यात आला. त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित असून याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता नाकरता येणार नाही. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray and his family visited NCP chief Sharad Pawar at the latters residence on his birthday