राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीविरोधात नागपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात नागपूरच्या लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पराज मेश्राम असं या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस अधिकारी नरेंद्र हिवरे यांनी सांगितले की, मेश्राम यांच्या फेसबुकवर नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करण्यात आली होती. मेश्राम यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्याविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी
दरम्यान, बुधवारी आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात नव्याने ५९७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ हजार ९१५ वर पोहचला आहे. तर ३२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा ४३२ वर पोहचला आहे. राज्य सरकारकडून कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्याचसोबत ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे.