पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंत्रिमंडळ विस्तारावेळी सेनेसह इतर घटक पक्षांची अपेक्षापूर्ती होईल : सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार

विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत निर्णय घेतील, अशी माहिती भाजप नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शिवसेना आणि इतर घटक पक्षांना अपेक्षित असाच निर्णय घेतला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.  

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे, असे संकेत यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिले होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात ६ जूनला दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत शहांसोबत चर्चाही केली होती. 

दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी दिले मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

विधिमंडळाचे अधिवेशन १७ जून रोजीपासून सुरू होत असून त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. राज्यातील आगामी विधानसभा तोंडावर आल्या असताना होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळात कोणते बदल केले जाणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरेल.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Cabinet expansion Sena and other allies will get as per their expectations says bjp leder Sudhir Mungantiwar