पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घटकपक्षांना शपथविधीचे निमंत्रणच नाही-राजू शेट्टी

राजू शेट्टी

प्रचंड राजकीय उलथापालथ होत राज्यात अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होत आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, प्रहार संघटना, शेकाप, रिपाई (कवाडे गट) यासारखे छोटे-छोटे पक्ष एकत्र येत आघाडी सरकार स्थापन झाले आहे. सत्ता स्थापन होण्यापूर्वी आमची विचारणा केली जात होती पण आता आम्हाला कोणीच विचारले नसल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.

मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता

मंत्रिमंडळात स्थान दूरच पण आम्हाला शपथविधीचे निमंत्रणही नसल्याची खंत शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. मलाच नव्हे तर कोणत्याच घटक पक्षांना शपथविधीचे निमंत्रण नाही. विरोधी पक्षांना शपथविधीचे निमंत्रण देण्याची परंपरा आहे. आम्ही तर घटक पक्ष आहोत, पण आम्हाला निमंत्रण नसल्याची प्रतिक्रिया देत राजू शेट्टी यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. 

दाट धुक्यांमुळे कार कालव्यात कोसळली; ६ जणांचा मृत्यू

शेट्टी पुढे म्हणाले की, आमच्या पक्षाचे नावच स्वाभिमानी आहे. त्यामुळे आम्ही आमचा स्वाभिमान जपणार. सत्ता स्थापन झाल्यानंतर घटक पक्षांना विसरले जाते. कर्जमाफीचाही पोरखेळ झाला. किमान समान कार्यक्रम ठरवातानाही असाच प्रकार झाला. शेकापलाही शपथविधीचे निमंत्रण दिले नाही. 

नाशिकः भाजप नगरसेविकेची विष प्राशन करुन आत्महत्या

दरम्यान, काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घटक पक्षांना शपथविधीचे निमंत्रण दिले असल्याचे सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra cabinet expansion maha vikas aghadhi not invited alliances for oath ceremony says raju shetti