पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखेर विस्तार झाला, आयात नेत्यांना सर्वांत प्रथम मंत्रिपदाची शपथ

राधाकृष्ण विखे पाटील आणि आशिष शेलार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली (ANI)

बहुचर्चित, बहुप्रतिक्षित असा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज (रविवार) राजभवन येथे पार पडला.राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपदासाठी जी नावे चर्चेत होती, अपेक्षेप्रमाणे त्यांनीच आज शपथ घेतली. काँग्रेसचा त्याग करत भाजपत आलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले बीडचे जयदत्त क्षीरसागर अशा आयात नेत्यांना सर्वांत प्रथम कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राज्यपाल राव यांनी ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, मिरजचे भाजप आमदार सुरेश खाडे, मोर्शीचे भाजप आमदार अनिल बोंडें, २०१४ मध्ये पहिल्यांदाच यवतमाळमधील राळेगावमधून आमदार झालेले अशोक उईके, शिवसेनेचे विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 

माझ्याकडे पंचांग नाही, मंत्रिमंडळ विस्तारावर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

यांना मिळाली राज्यमंत्रिपदाची संधी

त्यानंतर चारकोप मतदारसंघाचे भाजपचे आमदार योगेश सागर, रिपाइंचे अविनाश महातेकर, मावळ मतदारसंघातून भाजपकडून सलग ३ वेळा  विधानसभेवर निवडून आलेले आमदार संजय भेगडे, भाजपचे विधान परिषद सदस्य आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय परिणय फुके आणि औरंगाबाद पूर्वचे भाजपचे आमदार अतुल सावे यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. 

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सेनेच्या सर्व १८ खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर असल्यामुळे ते शपथविधी सोहळ्याला उपस्थितीत राहू शकले नाही.

विनायक राऊत लोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी

Updates:

- औरंगाबाद पूर्वचे भाजपचे आमदार अतुल सावे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम

- भाजपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांना राज्यमंत्रिपदाची शपथ. वयाच्या २६ व्या वर्षी नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून विजयी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय

- मावळचे भाजपचे आमदार संजय भेगडे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते भाजपचे राज्य सरचिटणीस आहेत. सलग ३ वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत

- रिपाइंचे अविनाश महातेकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

- चारकोप मतदारसंघाचे भाजपचे आमदार योगेश सागर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

- शिवसेनेचे विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

- २०१४ मध्ये पहिल्यांदाच यवतमाळमधील राळेगावमधून आमदार झालेले अशोक उईके यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची घेतली शपथ

- भाजपचे मोर्शीचे आमदार अनिल बोंडेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

- भाजपचे सुरेश खाडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

- भाजपचे डॉ. संजय कुटे यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

- मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची घेतली शपथ

- शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

- सर्वांत प्रथम राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची घेतली शपथ

- शपथविधी स्थळी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस दाखल

- सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दिवाकर रावते, सुभाष देसाई आदी नेते उपस्थितीत

- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे दिल्लीत दाखल

- राजभवन येते भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

- राज्य मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता असलेल्या नेत्यांचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra cabinet expansion in mumbai rajbhavan bjp shiv sena ashish shelar radhakrishna vikhe cm devendra fadnavis