पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी दिले मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. यावेळी त्यांना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावरील आरोपासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी यावर बोलणे टाळले. योग्य ती माहिती समोर येईल, प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात घाई करु नये, असे फडणवीस म्हणाले.  

तो विषय आता संपवायला हवाः शरद पवार

एमपी मिल कंपाउंड प्रकरणातील कारभार पारदर्शक नसल्याच्या वृत्ताने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता अडचणीत आले आहेत. लोकायुक्त एम. एल. तहलियानी यांनी आपल्या अहवालात मेहता यांचा कारभार पारदर्शक नसल्याचा उल्लेख केल्याची चर्चा प्रसारमाध्यमात रंगली आहे. दिल्लीतील अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराशिवाय  केंद्रात राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर रावसाहेब दानवे यांच्या जागी  प्रदेशाध्यक्षपदी कोणची वर्णी लागणार यासंदर्भातील चर्चा होणे देखील अपेक्षित आहे. 

गडकरींविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्यांची हकालपट्टी