पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंत्रिमंडळ विस्तार:काँग्रेसला १२ मंत्रिपदे, त्यापैकी १० कॅबिनेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतरचा हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आहे. काँग्रेसच्या कोट्यातून १२ मंत्री होतील. तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती देताना राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री तथा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, काँग्रेसच्या कोट्यातून १२ मंत्री शपथ घेतील. यामध्ये १० कॅबिनेट दर्जाचे असतील. मंत्र्यांच्या नावाची यादी तयार आहे. आजच मंत्र्यांची नावे जाहीर केली जातील. 

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडी सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काही मंत्र्यांनी शपथ घेतली होती. नंतर तिन्ही पक्षांमध्ये खात्यांची विभागणी झाली. काँग्रेसला महसूल, ऊर्जा, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, वस्त्रोद्योग, महिला आणि बालकल्याण विभाग मिळाले आहेत. शिवसेनेकडे गृह, शहरी विकास मंत्रालय आहे. तर राष्ट्रवादीला अर्थ, गृहनिर्माण, आरोग्य आणि सहकार मंत्रालय मिळाले आहे.

सीमावाद! कोल्हापुरात शिवसैनिकांनी कन्नड चित्रपटाचे शो बंद पाडले

सध्या काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, शालेय शिक्षण आदि विभाग आहेत. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याकडे अर्थ आणि नियोजन, गृहनिर्माण, अन्न व पुरवठा आणि श्रम मंत्रालय देण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह मंत्रालय देण्यात आले आहे. शिंदेंकडे शहर विकास पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि संसदीय कार्य मंत्रालय देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, जल संधारण आदि मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलची ३५ व्या वर्षी निवृत्ती

अजित पवार हे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. या सरकारमध्ये ते क्रमांक दोनची भूमिका निभावू शकतात. अनेक महत्त्वाच्या विभांगावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. परंतु, यासाठी शिवसेना तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल युगात या गोष्टींमुळे लोकांमध्ये चिडचिड होते : PM मोदी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Cabinet Expansion Balasaheb Thorat Says 12 Minister From Congress Will Take Oath Out Of 10 Will Be Of Cabinet Rank