पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संतप्त सूरात मुनगंटीवारांनी सभागृहात दिला ओबीसी जिंदाबादचा नारा

 अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. मुनगंटीवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या वस्तिगृहासंदर्भात तरतूद वाचून दाखवताना सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुनगंटीवार यांनी संतप्त सुरात ओबीसी जिंदाबाद! हा नारा दिला. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, असे सांगत त्यांनी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मुले आणि मुली वेगवेगळ्या गटात ३६ वस्तिगृहाची तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. 

यावेळी त्यांनी क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या नावाने इतर मागासवर्गीय विद्यार्थीनींसाठी शिष्यवृत्ती देणार असल्याचेही जाहीर केले. यात ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थीनींना प्रतिमहा ६० रुपये तर ७ वी ते १० वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी प्रति महा १०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. राज्यातील जवळपास २ लाख २० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.  

Maharashtra budget 2019: धनगर समाजासाठी विशेष तरतूद

विरोधकांवर संताप व्यक्त करताना मुनगंटीवार म्हणाले की, विरोधक नेहमीच ओबीसी आणि धनगर समाजासंदर्भातील मुद्यांवर विरोध दर्शवत असतात. हा तांत्रिक विरोध नाही. विरोधकांना देवसुद्धा सदबुद्धी देऊ शकत नाही.