पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे दहावीचा अखेरचा पेपर लांबणीवर!

वेगवेगळ्या केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी इतिहास विषयाचा पेपर दिला. (संग्रहित छायाचित्र

राज्यात कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा अखेरचा पेपर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या वेगाने होणाऱ्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी यासंदरभातील माहिती दिली आहे. १० वी परीक्षेचा सोमवारी २३ मार्च रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आला आहे. ३१ मार्च नंतर अखेरच्या पेपरचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे ट्विट  वर्षा गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन केले आहे. 

...सक्तीने घरी बसवायला भाग पाडू नका: तुकाराम मुंढे

यापूर्वी बोर्डाची परीक्षा वगळता अन्य परीक्षा घेण्यात येणार नसल्याची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील वेगवेगळ्या केंद्रावर शनिवारी दहावीच्या विद्यार्थ्यांनी इतिहास विषयाचा पेपर दिला. दहावीची बोर्डाची परीक्षा  ३ मार्च पासून सुरु झाली होती. २३ मार्चला अखेरचा पेपर घेण्यात येणार होता. मात्र आता हा शेवटचा पेपर लांबणीवर पडला असून ३१ मार्चनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. 

कोरोना चाचणी निकषांत ICMR कडून मोठा बदल, रुग्ण वाढण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले आहे. राज्यातील अनेक भागात जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सार्वजनिक वाहतूक सेवेतही अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना महाराष्ट्रातील आकडा हा सर्वाधिक आहे. सध्या आपण स्टेज 2 मध्ये असून ही तीव्रता वाढू नये, यासाठी सरकार आणि प्रशासन ठोस भूमिका घेत आहे. राज्यातील जनतेने सूचनांचे पालन करुन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सरकार आणि प्रशासनला साथ द्यावी, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.