पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

८२ % गुण मिळवून अभिनेत्री रिंकू राजगुरू बारावी उत्तीर्ण

रिंकू राजगुरू

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच आर्चीदेखील उत्तम गुणांनी  बारावी पास झाली आहे. रिंकूला ८२ % गुण मिळाले आहेत. रिंकूनं दहावीनंतर कला शाखा निवडली होती.

सोलापूर जवळील टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून तिनं परीक्षा दिली. तिला पाहण्यासाठी परीक्षा केंद्रावर मोठी गर्दी जमायची. रिंकूला पहायला आलेल्या चाहत्यांमुळे इतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती. रिंकूला ६५० पैकी ५३३ गुण मिळाले आहेत. 

इंग्रजीत ५४, मराठी ८६, इतिहास ८६, भूगोल ९८ , राज्यशास्त्र ८३, अर्थशास्त्र ७७ आणि पर्यावरण विषयात ४९ गुण रिंकूनं मिळवले आहेत. 'सैराट' चित्रपटादरम्यान रिंकू दहावीत होती त्यामुळे तिला दहावीच्या तयारीला फारसा वेळ देता आला  नाही. मात्र यंदा  तिनं 'कागर' चित्रपटाच्या  चित्रीकरणाची  वेळ सांभाळून बरावीच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्याचं  ठरवलं. 

या वर्षीच्या निकालामध्ये गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम या सर्वच शाखांचे निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आले आहेत. यंदा कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक म्हणजे ९३.२३ टक्के लागला आहे.