राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दहा खासदारही नसले तरी देशाच्या राजकारणात पवार हे नेहमीच केंद्रस्थानी असतात, एका वेळी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सोनिया गांधी यांसारख्या नेत्यांना देखील हाताळू शकतात, हे सगळं पवार कसं जुळवून आणतात याचंच मला कुतूहल वाटतंय, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पावरांवर चक्क 'पीएचडी' करण्याचा मानस व्यक्त केला.
ब्रिटन सरकारच्या तिजोरीच्या चाव्या नारायण मूर्तींच्या जावायाकडे
गुरुवारी चंद्रकांत पाटील यांची पुन्हा एकदा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पवारांवर निशाणा साधला मात्र त्याचवेळी त्यांच्यावर पीएचडी करण्याचा मानसही व्यक्त केला. देशाच्या राजकारणाचा विचार करायचा झाला तर पवारांकडे केवळ पाच ते सहाच खासदार असतील, अशावेळी देखील राजकारण करणं पवारांना कसं जमतं याचं कुतूहल माझ्या मनात कायमच आहे. कमी खासदार असूनही देशाच्या राजकारणात पवार कायमच केंद्रस्थानी राहिलेत. ते एकावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सोनिया गांधी यांसारख्या नेत्यांना हाताळतात. पवारांच्या या कौशल्याबद्दल मला नेहमीच उत्सुकता आहे आणि जर मला पीएचडी करण्याची अनुमती मिळाली तर मला त्यांच्यावर पीएचडी करायला आवडले', असं पाटील म्हणाले.
नेहरु-पटेल कॅबिनेटवरुन परराष्ट्र मंत्री जयशंकर-रामचंद्र गुहा आमनेसामने
मी ही इच्छा आदरानं आणि कुतूहलापोटी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले.