पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला मातोश्री आणि वर्षाहून फोन येताहेत, विजय वडेट्टीवार यांचा दावा

विजय वडेट्टीवार

एकीकडे विरोधी पक्षातून अनेक नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत दाखल होत असताना आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. आपल्याला परत पक्षात घेण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी चंद्रपूरमध्ये केले. 

राम मंदिर प्रश्नावर एकमत नाही, मध्यस्थ समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टात

चंद्रपूरमध्ये माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, मला आतापर्यंत वांद्र्याहून २५ फोन कॉल्स आले आहेत. शिवसेनेच्या नेत्यांकडून मला चर्चेसाठी निमंत्रण पाठवले जात आहे. पण मी त्यांच्या कोणत्याही निमंत्रणाला उत्तर दिलेले नाही. 

वांद्रे येथेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान आहे. त्यामुळे त्यांनी सूचकपणे वांद्रे म्हटले आहे. मातोश्रीवरून येणाऱ्या कोणत्याही फोन कॉल्सला मी उत्तर दिलेले नाही. पण त्यानंतर मला वर्षावरून दोन कॉल्स आले. पण मी स्पष्टपणे त्यांच्याशी या विषयावर बोलण्यास नकार दिला. मी सध्या ज्या पक्षात आहे. तिथे आनंदी आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीचा ड्युटीवरील पहिला फोटो व्हायरल

भाजपने आधीचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे भाजपवर कडी करण्यासाठी शिवसेना आता मला त्यांच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करते आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत २००५ मध्ये विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना सोडली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assesmbly election 2019 Got calls from Varsha and Matoshree says vijay Waddetiwar