पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युतीमध्ये 'विघ्न' येणार नाही : सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीमध्ये कोणीही विघ्न येणार नाही, असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि महाराष्ट्र भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने भाजप एक पाउल मागे घेत शिवसेनेसोबत युतीसंदर्भातील चर्चेचा श्रीगणेशा करणार आहे. 

निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपद वंचितकडे असेलः मुख्यमंत्री

युतीच्या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी 'ABP माझा' या मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, गणेशाची आगमनानंतर लवकरच युतीसंदर्भातील चर्चेचा श्रीगणेशाही होईल. विधानसभेच्या २८८ जागेवर महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत. जागा वाटपासंदर्भातील चर्चेतून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. शिवसेनेसह रामदास आठवले यांच्या रिपाइं आणि महादेव जानकर यांच्या रासप पक्ष आमच्यासोबत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युतीचा फॉर्म्युला हा भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेतूनच समोर येईल, असेही त्यांनी सांगितले. 

सीटिंग जागांना हात लावायचा नाही, युतीवरुन चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

एकमेकांच्या सीटिंग जागांना हात लावायचा नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या जागावाटपासंदर्भात केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर युतीचा सम-समान जागा वाटपाचा फार्म्युला सत्यात उतरणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्याच्या घडीला २८८ पैकी १२२ आमदार हे भाजपचे असून ६३ आमदार हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे युतीमध्ये होणारी चर्चा यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly elections 2019 bjp president chandrakant patil and Sudhir Mungantiwar playing importnant role on BJP And Shivsena Alliance