पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीचे आणखी चार आमदार भाजप-शिवसेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादी काँग्रेस

लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका मागून एक धक्के बसण्याचे सत्र अजून काही थांबलेले नाही. त्यातच येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणखी काही आमदार सत्ताधारी गटाच्या वळचणीला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविणारे संग्राम जगताप हेच आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत. लवकरच ते आपल्या मनगटावर शिवबंधन बांधणार असल्याची माहिती मिळते आहे.

अमित शहा गृहमंत्री आहेत, देव नाही, ओवेसींचा हल्लाबोल

संग्राम जगताप यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी तीन आमदार सत्ताधारी पक्षांमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये श्रीवर्धनमधून निवडून आलेले अवधूत तटकरे, वैजापूरमधून निवडून आलेले भाऊसाहेब चिकटगावकर, उल्हासनगरमधून निवडून आलेल्या ज्योती कलानी हे सुद्धा पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन वरिष्ठ नेत्यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'कडे या घडामोडींना दुजोरा दिला आहे. 'हिंदुस्थान टाइम्स'च्या प्रस्तुत प्रतिनिधीने स्वतंत्रपणे चारही आमदारांशी संवाद साधला. त्यापैकी तिघांनी पक्षांतराची शक्यता फेटाळून लावली. अवधूत तटकरे यांनी मात्र आपण शिवसेनेत जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने नाव न प्रसिद्ध कऱण्याच्या अटीवर सांगितले की, संग्राम जगताप आणि अवधूत तटकरे हे शिवसेनेत जाण्याची तर चिकटगावकर आणि ज्योती कलानी हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. जयदत्त क्षीरसागर आणि पांडुरंग बरोरा यांनी आधीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

अवधूत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. ते म्हणाले, येत्या काही दिवसांत काही घडामोडी घडू शकतात. पण अजून सर्वकाही निश्चित झालेले नाही. भाजप आणि शिवसेनेतील जागावाटपामध्ये श्रीवर्धनची जागा शिवसेनेकडे असणार आहे.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून यंदा सुनील तटकरे त्यांची मुलगी आदिती हिलाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून देण्याची शक्यता आहे. आदिती तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे अवधूत तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार मिळणार नाही. या पार्श्वभूमीवरच ते पक्षांतर करू शकतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने म्हटले आहे.

बालाकोट एअर स्ट्राइकच्या ५ महिन्यानंतर पाकने हवाई क्षेत्र केले खुले

संग्राम जगताप यांची सध्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांना कोणत्याही स्थितीत विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करायचा आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात संग्राम जगताप यांना ५० टक्केच मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात अहमदनगर शहर ही जागा शिवसेनेकडे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ते शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Assembly Elections 2019 Amid saffron wave 4 Maharashtra NCP MLAs may drift towards ruling parties