पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा पराभव, मतदारांची नाराजी निवडणुकीतून उघड

उदयनराजे भोसले

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी लाखापेक्षा अधिक मताधिक्याने उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. 

विधानसभेची निवडणूक एकतर्फी न होण्याची प्रमुख कारणे

मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून साताऱ्यातून विजयी झाले होते. पण सप्टेंबर महिन्यात त्यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली होती. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली होती. त्यानंतरही उदयनराजे भोसले यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाहीः शरद पवार

साताऱ्यामध्ये प्रचाराच्या शेवटी शरद पवार यांनी घेतलेल्या प्रचारसभेमध्ये भर पावसात त्यांनी भाषण केले होते. या भाषणाचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते. या भाषणामध्ये त्यांनी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देऊन आपण चूक केल्याचे भरसभेत कबुल केले होते. साताऱ्यामध्ये 'मान छत्रपतींच्या गादीला, मत राष्ट्रवादीला' ही घोषणा निवडणुकीआधी मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. ती खरीच असल्याचे निकालांवरून दिसते आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election udayanraje bhosale defeated from satara lok sabha constituency byepoll 2019