पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पक्षप्रवेश होत असले, तरी आमची युती अभेद्य - देवेंद्र फडणवीस

राज्यातील विविध नेत्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला

भाजपमध्ये येण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत. पण आम्ही त्या नेत्यांचे काम, कर्तृत्त्व बघूनच त्यांना पक्षात प्रवेश देत आहोत. त्याचबरोबर आमच्या पक्षात नेते येत असले, तरी विधानसभा निवडणूक आम्ही शिवसेना आणि मित्रपक्षांसोबत युतीनेच लढविणार आहोत. आता फक्त विजयाचे कोणते रेकॉर्ड आम्ही मोडतो, हेच बघायचे आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला. 

आमच्या पक्षातील जुन्यांची काळजी करू नका, चंद्रकांत पाटील यांचे उत्तर

काँग्रेसचे मावळते आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळते आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह अन्य नेत्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनीही यावेळी भाजपत प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करताना देवेंद्र फडणवीस यांनी या नेत्यांची गुणवैशिष्ट्ये नेमकेपणाने मांडली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, धाक दाखवून नेत्यांना पक्षात घेण्याचे दिवस गेले आहेत. अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. पण आम्ही सगळ्यांना पक्षात घेत नाही. त्या नेत्याचे काम, त्याचे कर्तृत्त्व बघूनच आम्ही त्याला पक्षात प्रवेश देतो. नेत्यांना पक्षात प्रवेश दिले जात असले, तरी विधानसभा निवडणूक आम्ही शिवसेनेशी युती करूनच लढविणार आहोत. जागा वाटपावरील चर्चा येत्या ८-१५ दिवसांत पूर्ण केले जाईल. काही जागा आमच्या त्यांच्याकडे जातील, काही त्यांच्या आमच्याकडे येतील. पण चर्चेतून आम्ही यावर मार्ग काढू. 

बीकेसी ते वाकड फक्त २३ मिनिटांत, हायपरलूप प्रकल्प सहा वर्षांत साकारणार

भाजपमध्ये येणाऱ्या कोणीही आमच्याकडे पदाची मागणी केलेली नाही. भाजपची कार्यप्रणाली त्यांनी अनुभवली आहे. २०-२५ वर्षांपासून रेंगाळलेली कामे आमच्या सरकारच्या काळात पूर्ण झाली. हे सगळे त्यांनी बघितले. त्यांच्या पक्षाचा अनुभव आणि आमच्या सरकारचा अनुभव घेतल्यावर त्यांनी भाजपमध्ये येण्याचे ठरविले. आपल्या भागाचा विकास घडवून आणायचा असेल, तर भाजपमध्ये गेले पाहिजे, हे समजल्यानेच त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 we will fight election with shivsena says devendra fadnavis