पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेकडून आदित्य ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

आदित्य ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेकडून पहिल्यांदाच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील, अशी भूमिका जाहीरपणे मांडण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामधून झाली. त्यावेळी पक्षाच्या नेत्यांकडून जाहीरपणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचे नाव उचलून धरण्यात आले.

... अखेर अजित पवार यांचा यू-टर्न

आदित्य ठाकरे हेच शिवसेनेची आणि महाराष्ट्रातील जनतेची  मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती असतील, असे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभेत सांगितले. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे यांनी राज्यातील पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण मते मिळवण्यासाठी किंवा कोणतेही पद प्राप्त करण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढलेली नाही, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

संजय राऊत म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत राज्याचे नेतृत्त्व करावे आणि राज्याचे भवितव्य ठरवावे, ही लोकांच्या मनातील इच्छा आहे. आदित्य ठाकरे यांच्यातील नेतृत्त्व गुण जनतेने ओळखले आणि स्वीकारले आहेत. 

सपा-बसपाला धक्का बसण्याची शक्यता, आणखी खासदार भाजपच्या वाटेवर

आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढविणारे ठाकरे कुटुंबातील पहिलेच सदस्य ठरण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी वरळी किंवा शिवडी या दोनपैकी एका मतदारसंघाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. 

जनआशीर्वाद यात्रेच्या शुभारंभानिमित्त केलेल्या भाषणात आदित्य ठाकरे म्हणाले, माझी ही यात्रा मते मिळवण्यासाठी नाही. तर नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी मी या यात्रेवर निघालो आहे. मी सर्व गावांमध्ये जाणार आहे. मग ते गाव शिवसेनेचा बालेकिल्ला असो किंवा नसो. भगवा झेंडा राज्यातील प्रत्येक घरावर लावण्याचे आमचे ध्येय आहे. मी या यात्रेकडे तीर्थयात्रा म्हणूनच बघतो आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Assembly Election 2019 Shiv Sena projects Aaditya Thackeray as Maharashtra CM candidate