पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... त्यांचे ह्रदय तपासावे लागेल, शरद पवार यांचा पक्ष सोडणाऱ्यांना टोला

शरद पवार

साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. साताऱ्यातील मावळते आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. 

उन्नाव पीडितेच्या कुटुंबाची सुरक्षेसाठी अनेक पत्रे, कारवाई नाही

शिवेंद्रसिंह राजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपत प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला आमदारकीचा राजीनामाही दिला. या सर्व घडामोडींच्या संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले, साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. जे लोक म्हणतात शरद पवार आमच्या ह्रदयात आहेत. त्यांचे ह्रदय तपासावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशापूर्वी त्यांनी शरद पवार आजही आपल्या ह्रदयात आहेत, असे म्हटले होते.