पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजू शेट्टींना धक्का! 'स्वाभिमानी'चे प्रदेशाध्यक्ष तुपकरांचा राजीनामा

राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी गुरुवारी आपल्या पदासह संघटनच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यात महायुतीची सत्ता आल्यावर तुपकर यांची महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती.  मात्र लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी महायुतीविरोधात भूमिका घेतल्यानंतर तुपकर यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.

पीएमसी बँकेच्या खातेदारांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा

'मी अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम केले. माझ्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. आज मी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे' अशा आशयाचे पत्र त्यांनी राजू शेट्टींना पाठवले आहे.  

Image may contain: text

ऑलिम्पिकवीर कुस्तीपटूसह भारताचा माजी हॉकीपटू भाजपात

सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांची साथ सोडल्यानंतर रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. त्यामुळेच तुपकर यांचा राजीनामा शेट्टींसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांचा राजीनामा आणि मुख्यमंत्र्यांसोबतची भेट यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: maharashtra assembly election 2019 ravikant tupkar resigns as state president of Raju Shettis wabhimani shetakri sanghatna