पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१३ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल : रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

विधानसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप निश्चत झाल्या नसताना येत्या १३ तारखेपासून राज्यात आचारसंहिता (Assembly Election Code of Conduct) लागू होईल, असा दावा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. जालन्यात एका कार्यक्रमात त्यांनी पुढील १२ दिवासांत आचार संहिता लागू होणार असल्याचे म्हटले आहे. 

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा अर्थव्यवस्थेला फटका : 

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर भाजपची जनादेश यात्रा सुरु आहे. १३ तारखेला आचारसंहिता लागू होईपर्यंत पुढील १२ दिवस जनादेश यात्रा सुरुच राहिल असे ते म्हणाले. ओबीसी समाजाच्या कार्यक्रमात ते म्हणाले की, यात्रा संपली की तुमच्या मागण्या एकदा कागदावर आणा. यासंदर्भात जालन्यात बैठक बोलवा, आम्ही देखील बैठकीला येऊ मागण्या समजून घेऊन त्याची पूर्तता कशी करता येईल ते पाहू.

सोलापुरच्या व्यासपीठावरुन अमित शहांनी दिले शरद पवारांना आव्हान

यापूर्वी महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मनगंटीवार यांनी गणेशोत्सवानंतर निवडणुका होऊ शकतात असा अंदाज वर्तवला होता. गणेशोत्सव संपल्यानंतर आचारसंहिता लागू होऊ शकते. १५ ऑक्टोबरपर्यंत मतदान होईल, असे ते म्हणाले होते.  
ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभेची मुदत संपणार आहे. गेल्या वेळी १८ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. त्यामुळे यावेळेसही सप्टेंबरमध्येच विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील असा अंदाज आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 raosaheb danve says assembly election code of conduct will be from 13th september