पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामासारखी घटनाच महाराष्ट्रातील जनतेचं मत बदलू शकतेः शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराचे रणशिंग फुंकले गेले आहे. पक्षातील दिग्गजांनी साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी औरंगाबाद येथे आलेल्या शरद पवारांच्या एका वक्तव्यामुळे मात्र नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पुलवामासारखा एखादा हल्लाच लोकांचे मत बदलू शकतो, असे वक्तव्य त्यांनी केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभारावर जनतेत नाराजी असल्याचे ते म्हणाले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी लोकांमध्ये राग आणि चीड होती. परंतु, सीआरपीएफ जवानांवर पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण परिस्थितीच बदलून गेली. 'एएनआय'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पक्षांतर करून आलेल्या बहुतांश नेत्यांना भाजपकडून उमेदवारी पक्की

पुलवामा हल्लासारखी घटनाच लोकांचा कल बदलू शकते. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पुलवामा हल्ल्याबाबत मीही चौकशी केली. हा हल्ला जाणीवपूर्वक रचल्याचा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला. मी संरक्षण खात्याचे मंत्रिपद सांभाळलेले आहे. जेव्हा याबाबत काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला, तेव्हा एकतर हा हल्ला जाणीवपूर्वक रचला गेल्याचे वाटते किंवा यामागे पाकिस्तानचा हात असू शकतो, असे त्यांनी म्हटले. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर मोदी सरकारने पाकिस्तान हद्दीतील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. 

एअर स्ट्राइकमुळे मोदी सरकारच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे पवार यांनी म्हटले. परंतु, मोदींची लोकप्रियता महाराष्ट्रात चालू शकणार नाही. फडणवीस सरकारच्या कारभारावर महाराष्ट्रातील जनता खूश नाही. भाजपला विधानसभा निवडणुकीत मोठे नुकसान होईल. राष्ट्रवादीकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सत्तेत पुन्हा यावे असे फडणवीस सरकारने कामच केले नसल्याचे पवार यांनी म्हटले. 

'मोठ्या भावाप्रमाणे बाळासाहेबांनी एकत्रित लढण्याबाबत निर्णय घ्यावा'

पवार काँग्रेसबरोबरील आघाडीबाबत म्हणाले की, धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्रित यावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली असून बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी आणि काही छोट्या पक्षांनाही एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

राज ठाकरे यांच्याशी आघाडी करण्यास उत्सुक

यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेबरोबर आघाडी करण्यास राष्ट्रवादी इच्छुक असल्याचेही स्पष्ट केले. पण यासाठी काँग्रेस तयार नसल्याचे ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Only Pulwama attack like incident can change peoples mood in Maharashtra Sharad Pawar