पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, वर्धापनदिनी पक्षाचा निर्धार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

सत्तेत शिवसेनेने भाजपशी युती केली असली, तरी ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे आणि याच निर्धाराने उद्याची विधानसभा भगवी करून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच विराजमान होईल, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकाच्या अग्रलेखात म्हटले आहे. शिवसेनेचा बुधवारी ५३वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त लिहिलेल्या अग्रलेखात पुन्हा एकदा शिवसेनेने युतीत असलो, तरी आमचा बाणा स्वतंत्रच असल्याचे म्हटले आहे.

न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य ही काही एकवेळची गोळी नाही - सरन्यायाधीश

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता सगळ्यांनाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना युतीने लढणार असल्याचे लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही पक्ष समसमान जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. पण निवडणुकीच्या निकालांनंतर सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपदाचे काय, या संदर्भात अधिकृतपणे काहीच सांगण्यात आलेले नाही. एकीकडे मुख्यमंत्रीपद कायमस्वरुपी भाजपकडे राहावे, यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील नेत्यांना प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनाही या पदासाठी आग्रही आहे, हेच आजच्या अग्रलेखामधून दिसून आले आहे.

संतप्त सूरात मुनगंटीवारांनी सभागृहात दिला ओबीसी जिंदाबादचा नारा

अग्रलेखात म्हटले आहे की, 'शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही ५३ वर्षांची मजल मारू शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करून सोडू व शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल.'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 next chief minister would be from shivsena says party mouthpiece