पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हे वागणं बरं नव्हं! शरद पवारांचा उदयनराजेंना अप्रत्यक्षपणे टोला

शरद पवार (TWITTER)

माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच साताऱ्याचा दौरा केला. आपल्या  जोरदार शक्तीप्रदर्शनानंतर त्यांनी शिवकालीन इतिहासाचा दाखला देत शरद पवारांनी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.

'काश्मीरमध्ये तिरंगा फडकल्याचा आम्हालाही अभिमान, पण...'

मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज दिल्लीला गेले होते. पण औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा सन्मान मिळाला नाही. या घटनेनंतर महाराज तिथून निघून आले. त्याच्या या कृतीमुळे त्यांना आग्र्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले. यासर्व घटनेनंतर महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. आणि आता काय सुरुय...? असा प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षपणे उदयनराजे यांनी टोला लगावला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 NCP Leader sharad pawar target Udayanraje Bhosale and shivendra raje bhosale in satara rally