पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा

अजित पवार

माजी उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानकपणे आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला देखील आहे. अजित पवार यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात विधीमंडळातील कार्यालयात येऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा सोपवला.   

शरद पवारांनी शिवसेनेचेही मानले आभार

हरिभाऊ बागडे यांनी 'एबीपी माझा' या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विधीमंडळाच्या कार्यालयात येऊन त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरामध्ये माझ्या पीएकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर अजित पवार यांनी फोनवरुन राजीनामा मंजूर करण्याबाबत माझ्याशी संपर्क साधल्यानंतर मी राजीनामा मंजूर केला, असे त्यांनी सांगितले.  अजित पवार यांनी अचानक राजीनामा का दिला? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.