पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिला, पुरुष मतदार नोंदणीत पुणे अग्रस्थानी; तृतीयपंथी नोंदणीमध्ये मुंबई उपनगर अव्वल

सातव्या टप्प्यातील मतदान

राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदारसंख्येत आघाडीवर आहे. तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे.
राज्यात ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत चार कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष मतदार, चार कोटी २७ लाख पाच हजार ७७७ महिला तर दोन हजार ५९३ तृतीयपंथी अशा एकूण आठ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झाली आहे.

इम्रान खान यांचा कबूलनामा: अल कायदाला पाकिस्तानात दिले प्रशिक्षण

पुणे जिल्ह्यात एकूण ४० लाख १९ हजार ६६४ पुरुष मतदार तर ३६ लाख ६६ हजार ७४४ महिला मतदार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ३९ लाख २९ हजार २३२ पुरुष मतदार तर ३२ लाख ९७ हजार ०६७ महिला मतदार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण ३४ लाख ४७ हजार १४८ पुरुष मतदार आणि २८ लाख ८१ हजार ७७७ महिला मतदार आहेत.

'अधिकाऱ्यांनी काहीच चूक केली नाही तर चिदंबरम कसे जबाबदार'

तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मुंबई उपनगर जिल्हयात एकूण ५२७ तृतीयपंथी मतदार, ठाणे जिल्ह्यात ४६० आणि पुणे जिल्ह्यात २२८ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे.