पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनेक मतदारांची उमेदवारांऐवजी NOTA ला पसंती

मतदान ओळखपत्र

विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये गुरुवारी काही मतदारसंघांमध्ये NOTA पर्यायाला मिळालेली मते लक्षवेधी ठरली आहेत. वरीलपैकी कोणीही नाही, असे जर एखाद्या मतदाराला सांगायचे असेल, तर तो ईव्हीएमवरील नोटाचा पर्याय निवडतो. पण काही मतदारसंघांमध्ये नोटा पर्यायाला मिळालेली मते लक्षवेधी आहेत.

निकालाआधीच भाजपची सेलिब्रेशनची तयारी

सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे विश्वजीत कदम निवडणूक लढवित आहेत. हा मतदारसंघ कदम कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. पण यावेळी या मतदारसंघामध्ये अनेक लोकांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये या मतदारसंघात २४२४ जणांनी नोटाचा पर्याय निवडला.

Assembly Election Results LIVE: मुंब्र्यात जितेंद्र आव्हाड २५ हजार मतांनी आघाडीवर

लातूर ग्रामीण आणि कल्याण ग्रामीण या दोन्ही मतदारसंघांमध्येही अनेक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.