पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमचे काम गेल्या सरकारच्या दुप्पट, देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आरंभ

महाजनादेश यात्रेचा आरंभ (फोटो - भाजपच्या ट्विटर हँडलवरून साभार)

७० वर्षांतील समस्या ५ वर्षांत सोडविता येऊ शकत नाही. तरीही गेल्या सरकारांच्या दुप्पट काम आमच्या सरकारने केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आरंभ मोझरीमधून झाला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. 

उन्नाव प्रकरण : खटला दिल्लीला वर्ग, ७ दिवसांत तपासाचे सीबीआयला निर्देश

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील सर्व समस्या संपल्याचा दावा आम्ही करणार नाही. पण गेल्या पाच वर्षांत राज्य सुखी, समृद्धी करण्याचे काम आमच्या सरकारने केले. विरोधकांनी कोणत्याही व्यासपीठावर आमच्याशी वाद-विवाद करावेत. आम्ही तयार आहोत. त्यांच्यापेक्षा दुप्पट काम आम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये केले आहे. 

आमचे सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले आहे. आतापर्यंत कर्जमुक्ती, विमा, पंतप्रधान शेतकरी योजना, दुष्काळी मदत या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांवर गेल्या पाच वर्षांत ५० हजार कोटी रुपये आम्ही खर्च करण्यात आले आहेत. आधीच्या कोणत्याही सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा शेतकऱ्यांसाठी खर्च केले नसल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भामध्ये २० हजार कोटी रुपयांची सिंचनाची कामे सुरू करण्यात आली असून, राज्यात दीड लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. विदर्भ आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले. 

राज्यात तब्बल ३० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार झाले आहेत. त्यापैकी ३ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते ग्रामीण भागात तयार करण्यात आले आहे, याकडे आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.

जनगणना २०२१ हायटेक, स्वतः ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा

जेव्हा माझ्या आयुष्यात कोणतीही चांगली घटना घडते, तेव्हा राजनाथ सिंह तिथे उपस्थित असतात, अशी आठवणही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितली. जनता हेच आमचे दैवत असून, आम्ही सेवक आहोत. जनतेचे आशीर्वाद घ्यायला मी ही जनादेशयात्रा काढली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 mahajanadesh yatra by chief minister devendra fadnavis started from mozari amravati