पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणूक तयारीला वेग, प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश

निवडणूक आयोग

विधानसभा निवडणूक यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज होऊन समन्वयाने काम करावे, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी गुरुवारी दिले आहेत.

राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा सिन्हा यांच्यासह निवडणूक आयोगाचे अन्य उप निवडणूक आयुक्त चंद्र भूषण कुमार, सुदीप जैन, महासंचालक दिलीप शर्मा, धीरेंद्र ओझा यांनी गुरुवारी राज्यस्तरीय समन्वय अधिकाऱ्यांबरोबर आयोजित बैठकीत घेतला. यावेळी प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे उपस्थित होते.

चांद्रयान २ साठी महत्त्वाचा क्षण, विक्रम लँडर शनिवारी चंद्रावर उतरणार

निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांच्या आणि मद्याच्या वापरावर आळा घालण्यासाठी तसेच अवैधरित्या मद्य आणि रोकड वाहतूक यावर लक्ष ठेवण्यासाठी पाळतीची सक्षम यंत्रणा निर्माण करावी, असे निर्देश यावेळी उप निवडणूक आयुक्तांनी दिले. आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागांनी टोल फ्री क्रमांक, व्हाट्सएप क्रमांक आणि नियंत्रण कक्ष तात्काळ कार्यान्वित करावेत. नागरिकांना याबाबत माहिती द्यायची असल्यास त्यासाठी नियंत्रण कक्ष, व्हाट्सऍप क्रमांकाची प्रसिद्धी वृत्तपत्रांतून नियमित जाहिरातीद्वारे तसेच सोशल मीडियावरून करण्यात यावी. सी-व्हिजिल या ॲपवर येणाऱ्या तक्रारी सर्व संबंधित यंत्रणाकडे तात्काळ पाठवाव्यात, अशाही सूचना देण्यात आल्या.

निवडणुकीदरम्यान १० हजार रुपयांवरील सर्व व्यवहार डिजिटल पेमेंट किंवा धनादेशाने करण्यासाठी उमेदवारांना प्रोत्साहित करावे. रोख रकमेची वाहतूक तसेच हवालाद्वारे पैशाचे हस्तांतरण यावर लक्ष ठेवावे.

हर्षवर्धन पाटलांच्या आरोपांमुळे धक्काः सुप्रिया सुळे

बँकांनी निवडणूक काळात दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड काढण्याच्या प्रकरणांची माहिती तत्काळ जिल्हाधिकारी तसेच आयकर विभागाला द्यावी.
उमेदवारांचा निवडणूक खर्च आणि अवैध पैशाचा वापर याबाबत काटेकोर पर्यवेक्षण करण्यात यावे. पैशाच्या वापरावर आळा घालण्यासाठी अंतर्गत माहिती यंत्रणा सक्षम करून अशा प्रकरणात तात्काळ छापे आणि जप्तीसारखी कारवाई करावी.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 election commission officials meet state government officials take stock of situation