पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्रीसाहेब खोटं बोलताना जीभ कचरत नाही का, धनंजय मुंडेंचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे

महाराष्ट्रातील आमचे पहिलेच सरकार आहे, ज्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा डाग नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला आहे. इतके धडधडीत खोटे बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कशी कचरत नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. मुंडे यांना यासाठी भ्रष्ट्राचाराचा आरोप असलेल्या मंत्र्यांची नावेच टि्वट करत मुख्यमंत्री फडणवीस यांना जाब विचारला आहे. 

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना युतीचेच सरकार सर्वांधिक कलंकित असल्यामुळे प्रकाश मेहता यांना घरी जावे लागल्याचे म्हटले आहे. त्यांनी एकापाठोपाठ एक टि्वट करत मुख्यमंत्री फडणवीस यांना धारेवर धरले.  

नारायण राणेंचा भाजप प्रवेश युतीच्या वाटाघाटींवर अवलंबून, सूत्रांची माहिती

ते पुढे म्हणाले, खोटी कागदपत्रे सादर करून शेतकऱ्यांचे अनुदान लाटल्याचा लोकायुक्तांनी ठपका ठेऊनही सुभाष देशमुख यांना मुख्यमंत्री महोदय तुम्ही मंत्रिपदावरून काढू शकला नाहीत. अजून बऱ्याच भ्रष्ट मंत्र्यांनी घरचा रस्ता पकडला असता, मात्र तुमच्या कृपादृष्टीने त्यांना तारलं आहे.

मी स्वतः १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे बाहेर काढले. मुख्यमंत्री महोदय तुम्ही मात्र क्लिनचिट मास्टर निघालात. हिंमत असेल तर तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी होऊ दया. मग तुमच्या सरकारवरील डागांचा हिशोब कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा पक्ष सोडण्याच्या तयारीत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 dhananjay munde slams on cm devendra fadnavis for false statements