आम्ही नागरिकांशी संवाद करीत असून, विरोधक ईव्हीएमशी संवाद करताहेत. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ईव्हीएम मत देत नाही. मते मतदार देतात. त्यांच्याशी संवाद केला, तर मते मिळू शकतात. मतदारांच्या विश्वासाला पात्र झाले, तरच मते मिळतात, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये विरोधकांना दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
... म्हणून पाकने LOC जवळचे दहशतवादी मागे नेले आणि परत पाठवले
राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाओचा नारा दिला होता. ईव्हीएमविरोधात येत्या २१ ऑगस्टला मुंबईत सर्व विरोधी पक्ष मोर्चाही काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ईव्हीएमचा मुद्दा फेटाळून लावला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, निराश, हताश, पूर्णपणे भरकटलेला, मुद्द्यांपासून दूर गेलेला असा विरोधी पक्ष राज्याच्या इतिहासात आम्ही कधी बघितलेला नाही. निवडणुका येतात आणि जातात. जय-पराजय होत असतो. पण पराजयानंतर लोकांवर नाराजी व्यक्त करायची नसते. लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास वाढला पाहिजे, असे काम आपण केले पाहिजे.
हर घर, नल से जल, मोदी सरकारचा या टर्ममधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प
देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी नागपूरमध्ये आहे. अमरावतीमधून सुरू झालेली ही यात्रा वर्धा जिल्ह्यानंतर आता नागपूरमध्ये दाखल झाली आहे. या यात्रेला सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असे त्यांनी सांगितले.