पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुमचे आशीर्वाद राहिले तर मीच मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

भाजपमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे निवडून आलेले आमदार आणि केंद्रीय नेतृत्त्व निश्चित करत असते. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहिले, तर मीच मुख्यमंत्री होईन, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

आमचा संवाद नागरिकांशी, त्यांचा ईव्हीएमशी; फडणवीस यांचा विरोधकांना टोला

पक्षाने सांगितले तर मी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी म्हटले होते. त्यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, चंद्रकांतदादा काय बोलले, हे मला माहिती नाही. आज सकाळी माझे त्यांच्याशी काही बोलणे झालेले नाही. भाजपमध्ये आमदार आणि केंद्रीय नेतृत्त्व मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवित असतो. तुमचे आशीर्वाद राहिले तर मीच मुख्यमंत्री होईन. बाकी चंद्रकांतदादा माझे चांगले सहकारी आहेत. नव्यानेच त्यांनी राज्याचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्यांना त्यांचे काम व्यवस्थितपणे करू द्या, असेही फडणवीस म्हणाले.

छत्तीसगडः चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 devendra fadnavis on next chief minister and chandrakant patil statement